“स्वप्न पूर्ण करावीत, पण ती पूर्ण करताना आयुष्य ही जगावं”.
आजचा हा लेख म्हणजे प्रत्येक माणूस जगत असलेलं एक आभासी जग..
आयुष्य एक मृगजळ..
माणूस आणि मृगजळ ह्यांच एक वेगळच नात
आहे. मृगजळ म्हणजे आभास. एखाद्या गोष्टीचा केलेला अतिरेक.. जो माणूस आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर काहीतरी मिळवण्यासाठी करतोच. माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर हे मृगजळ
समोर येतच.. कधी स्वप्नांच मृगजळ तर कधी हव्यासाच मृगजळ. आयुष्यभर ह्या मृगजळाच्या
मागे फिरताना माणूस सत्य आणि भास हयात इतका पिळून निघतो की, आयुष्याच्या शेवटच्या
काही क्षणात त्याला हे जग सुद्धा आभासी वाटू लागत.. बुद्धी,मन सगळ काही बंद होत.
चालू असतो तो भास;त्या दिसणाऱ्या मृगजळाजवळ पोहोचण्याची घाई, हीच फक्त त्या वेळी
त्याच्या सोबतीला असते..
खरं तर, मृगजळ हे मुळातच आपल्या मनाने
कायमस्वरूपी ह्या ना त्या कारणासाठी केलेली एक आभासी दृष्टी आहे. माणसाला वाटत
आपल्या मनात किंवा आपल्या आसपास असं आभासी जग निर्माण केलं की, मनाला समाधान
मिळत.. मग त्यासाठी एखादी न मिळालेली गोष्ट चांगलीच नव्हती, हयाहून अजून चांगली
घेईल मी.. असे विचार आपण चालू करतो. पण परिस्थिती मात्र स्वीकारणं जमत नाही माणसाला..
आणि मग सुरू होतो एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रवास.
खरंच, मनावर ताबा मिळवणं किती अवघड असत ना
! एखाद्या गोष्टीसाठी कष्ट करूनही जेव्हा ती मिळत नाही तेव्हा मग माणूस एकतर खचून जातो
नाहीतर आशा ,अपेक्षा वाढवतो.. अर्थात पुन्हा मृगजळ..! आहे त्यात सुखी राहणं प्रत्येकालाच
जमत असं नाही. पण ज्याला जमत तो आनंदी,समाधानी असतो आयुष्यात.. नाहीतर मग आहेच काही
तरी मिळवण्याची धडपड आणि त्यात राग,द्वेष हे तर येताच सोबतीला. मोठं होण्याची स्वप्न
बघताना माणूस हे विसरून जातो की,आज असणार आयुष्य उद्या असेलच असं नाही.. हव्यासापोटी
एखाद्या गोष्टी मागे फिरताना चार सुखाचे क्षण आपल्या हातातून निघून जातात हे जेव्हा
लक्षात येत, तेव्हा आयुष्याचे काही मोजकेच सेकंद राहिलेले असतात.
आयुष्यभर स्वप्नातल्या एखाद्या मृगजळामागे
फिरण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानून जगण्यात काय वाईट आहे..? हवं ते मिळवण्यासाठी प्रयत्न
करणं चांगलच आहे. पण त्या प्रयत्नात आयुष्यच जगायच राहून गेलं तर..! आज मिळालेलं आयुष्य
उद्या मिळेलच असं ठरलेलं तर नाहीये.. स्वप्नवत मृगजळामागे किती आणि का फिरायच हे पूर्णपणे
आपल्याच हातात असत. “स्वप्न पूर्ण करावीत पण ती पूर्ण करताना आयुष्य ही जगावं”.
5 टिप्पण्या
अगदी अगदी... आपण आनंद हा वर्तमानात न बघता भविष्यावर अवलंबून ठेवतो. आणि तिथेच चुक करतो आपण....छान लिहलंस👌
उत्तर द्याहटवाहो. आयुष्य एकदाच भेटत त्यात ते किती आणि कसं जगायचं हे आपल्याच हातात असत.. Thanks 😍😊
हटवाJe ahai tyatach khush rahil pahije ....these the rule for living life.
उत्तर द्याहटवाYes..😍😊
हटवाJe ahai tyatach khush rahil pahije ....these the rule for living life.
उत्तर द्याहटवा