मन जेव्हा कारण नसताना उदास होत..




मन जेव्हा कारण नसताना उदास होत..

 

      कधी कधी कारण नसताना आपल्याला उदास वाटत असत.. आयुष्यात सगळं चांगलं चालू असत, पण तरी सुद्धा आपलं मन खुश नसत. आणि मग मन खुश नसत म्हणून नकळत आपली चिडचिड होत असते. आपल्या आसपास सगळं नीट चालू असत पण तरी कशातच मन लागत नसत. ह्याची फक्त दोनच  कारणं असतात.  ती म्हणजे, एकतर आपण आयुष्यात होणाऱ्या गोष्टींमध्ये आनंदी नसतो म्हणून आपण उदास होतो.  नाही तर दुसरं म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला कंटाळलेलो असतो म्हणून आपण उदास होतो.

      कारण, रोज रोज त्याच गोष्टी करून प्रत्येक व्यक्ती वैतागत असते. आणि मग आयुष्यात कितीही चांगल्या गोष्टी होत असल्या तरी आपण कंटाळलेलो असतो म्हणून त्या आपल्याला चुकीच्याच वाटत असतात.  मग आपण असं अचानक मन उदास झाल्यावर, आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या नसतात; त्या मिळाल्या नाही म्हणून त्याचं दुख करत बसतो.

      खरं तर असं मन अचानक उदास होणं हे सहाजिकच असत. कारण, आपण रोजच्या कामांमध्ये इतकं गुंतून जातो की, एखादं दिवस नकळत आपण विनाकारण उदास होऊन बसतो. आणि मग त्या दिवशी आयुष्यात चुकीच्या झालेल्या किंवा वाईट घडलेल्या गोष्टी नकळत आपलं मन आपल्या डोळ्यासमोर घेऊन येत असत.

      मग अशावेळी बऱ्याचदा आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो, मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो, किंवा मग जवळच्या एखाद्या व्यक्तीजवळ जाऊन मनातलं बोलतो. हे केल्याने कधी बरं वाटत तर कधी काहीच फरक पडत नाही. मग काही फरक पडला नाही की, कधी आपल्याला सगळं सोडून द्यावं असं वाटत तर कधी आता काय करावं हा प्रश्न पडतो..

      पण आपलं मन हे असं अचानक उदास होत असत कारण, आपला मेंदू आयुष्यात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीमुळे थकून गेलेला असतो, आणि मग त्याच त्याच गोष्टी पुन्हा समोर आल्यावर किंवा आयुष्यात सुरू असणाऱ्या वाईट गोष्टी ह्यामुळे आपलं मन उदास होऊन जात. खरं तर हे असं उदास वाटणं काही काळासाठी असत. कारण आपल्याला काहीच झालेलं नसत पण आपलं मन थकलेलं असत म्हणून हे होत असत.

      एकदा आपण आपल्या आयुष्यात पुन्हा व्यस्त झालो की, ह्या सगळ्या गोष्टी नकळत मागे सुटत जात असतात. म्हणूनच  कारण नसताना अचानकपणे असं मन उदास झाल्यावर, फार विचार न करता आपण थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे म्हणजे आपलं मन पुन्हा शांत होत.

 

            -मराठी लेखणी  

           

 

 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. Kadhi kadhi as achanak mun lagat nhi samjat nhi ky hotay pn...as junya goshti athvtat kahihi n zalel astana mhanje as kahi zalel nast Jun athvnyasarkh tri athavt teva mun jast udas hot...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बरोबर.. कारण आपण त्यातून बाहेर पडत असलो तरी पुन्हा काही वेळाने आपलं मन तिथेच अडकून जात. ह्यासाठी आपण स्वतःला थोडा वेळ देत, नवीन गोष्टीत मन गुंतवलं की मनावरच बराच ताण हलका होतो..

      हटवा
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)