निस्वार्थ प्रेम..
कधी कधी असं वाटतं, लोकांना
निस्वार्थपणा ह्याचा अर्थच कळत नाही. स्वतःतच गुंतणं, स्वतःच्या
स्वार्थासाठी दुसऱ्याच मन दुखावणं..हेच तर करत आहे सध्या लोक..
निस्वार्थ म्हणजे कसलाच स्वार्थ न ठेवता
एखाद्याला मदत करणं किंवा कोणाचं मन न दुखावणं. पण माणूस खरंच असं वागतो का..?
कामापुरतं एखाद्यासोबत नीट वागणं,गोड राहणं
आणि काम झालं कि, तू कोण आणि मी कोण..?
मनातली एखादी गोष्ट जशीच्या तशी समोरच्याला का नाही सांगत कोणी..?, कारण स्वार्थ.. राग आला तर..? मग परत
माझं हे काम नाही झालं तर, ते राहून गेलं तर..
का ? , कशासाठी...? फक्त स्वार्थासाठी..!
ह्याच स्वार्थासाठी बऱ्याचदा एखादी न पटणारी गोष्ट पण पटवून घेतली जाते.
म्हणजे मनाला न पटणारी गोष्ट पण काही तरी भेटेल ह्या आशेने एखादी गोष्ट केली
जाते.. ह्याला खरं तर विश्वासघात म्हणतात.. समोरचा एवढ्या विश्वासाने आपल्यासोबत
त्याचं दुख-त्याचं सुख सांगत असतो पण बरेच लोक त्यात असा स्वार्थ पाहून आपली काम
करून घेत असतात..
एवढंच काय, काही
माणसं प्रेमात ही स्वार्थी वागतात.. समोरच्याकडून
काय आणि कसं मिळेल आणि कुठपर्यंत मिळेल एवढंच पाहिल्या जातं..,
असं असत का प्रेम..? , कुठलीच
अपेक्षा न ठेवता फक्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम का नाही करू शकत?
जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम केल्या जात तेव्हा तिथे कोणताच स्वार्थ
नसतो,अपेक्षा नसते.. असत ते फक्त निरागस प्रेम.. खरं तर ,आपुलकी, काळजी, निस्वार्थ
भावना ह्या सगळ्याचा एकत्र सार म्हणजे प्रेम असत.
आणि असं तर अजिबात नाही की, ‘एखाद्या
नात्यात अपेक्षा नसावी; पण त्या अपेक्षेलाही काही मर्यादा
आहेत ना..!’ , समोरच्याला दुखावून स्वतःसाठी काही
करून घेणं हे निस्वार्थ प्रेम कसं असेल..? निदान प्रेमात तरी
स्वार्थ नसावा..!
‘प्रेमात फक्त भावना असावी, प्रेमात एकमेकांना
कायमसाठी जोडून ठेवणारी बांधिलकी असावी..’
थोडक्यात, सांगायचं
तर आईसारखं निस्वार्थ प्रेम करायला शिकलं तर आयुष्यात कोणीच प्रेमाचा तिरस्कार
करणार नाही.
ज्याच्यावर प्रेम आहे त्याने किंवा तिने कायम सोबत राहावं, आयुष्यभर साथ दयावी, विश्वास जपावा ह्या अपेक्षा
प्रत्येकाच्या असतात.. पण ह्या उलट काही असेही असतात ज्यांना फक्त आपला फायदा करून
घ्यायचा असतो, त्यांचं मन भरलं की, ते
त्यांच्या पद्धतीने सहज आपल्यापासून लांब जातात.. आणि ह्याचा परिणाम ज्याने
मनापासून प्रेम केलं त्याच्यावर होतो.. कारण त्याची अपेक्षा फक्त थोड्याश्या
प्रेमाची आणि विश्वासाची असते.. मग असं कोणी
वागलं की, सहाजिकच त्या व्यक्तीचा प्रेमावरचा विश्वास संपतो.
ह्या स्वार्थीपणामुळे एकच होत; आपण स्वतःसाठी समोरच्याच मन दुखावतो, आपलं सगळ
काम झालं की, हळू हळू दुर्लक्ष करत जातो.. पण ह्यामुळे समोरच्याला जो त्रास होतो त्याचं काय..? जेव्हा त्या व्यक्तीचा विश्वास तोडलया जातो तेव्हा त्या व्यक्तीला किती
त्रास होत असेल, ह्याचा एकदातरी प्रत्येकाने विचार करायलाच
हवा..
शेवटी मैत्री, प्रेम किंवा व्यवहार ह्यात
विश्वास महत्वाचा असतो. कारण एखादी गोष्ट जेव्हा
निस्वार्थपणे करायची असते तेव्हा विश्वास हा सर्वात आधी येतो, मग बाकीच्या अपेक्षा येत असतात.. आणि
असंच जेव्हा आपण एखादी गोष्ट अपेक्षेशिवाय करतो
तेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक नातं हे निस्वार्थीपणे जपतो,
अशावेळी समोरचा आपला विश्वास तोडताना चारदा विचार करतो; की, खरंच ह्या व्यक्तीसोबत मी असं करणं बरोबर आहे
का..?, सांभाळू शकेल का ही व्यक्ती नंतर स्वतःला..?
असे प्रश्न तेव्हा त्या व्यक्तीला पडू लागतात.. म्हणूनच तर प्रत्येक
नात्यात कायम विश्वासाला महत्व दिल्या जात.
- मराठी लेखणी
0 टिप्पण्या