आयुष्याचा सोबती..




                         आजचा लेख त्या व्यतीसाठी जी आपल्या आयुष्यात असणाऱ्या त्या खास व्यक्तीबद्दल                जी आपल्या साठी सगलेत महत्वाची असते.. 

आयुष्याचा सोबती..

                    आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणाची तरी सोबत ही हवीच असते.. कळत नाही तेव्हा आईवडिलांची सोबत हवी असते, मग थोडं मोठ व्हायला लागल्यावर एखाद्या भांवडाची सोबत हवी असते.. आणि मग आयुष्य स्वतःच्या विचाराने जगायला लागल्यावर एका साथीदाराची सोबत लागते. आपली आई मायेने,प्रेमाने काळजी घेत असते, वडील सगळे हट्ट पुरवत असतात आणि भाऊ-बहीण सुख दुखात कायम सोबत उभे असतात अगदी तसंच एक सोबती प्रत्येकाला हवा असतो. ज्यात आपल्याला मित्र, आई वडील, भाऊ बहीण आणि एका जोडीदराचं प्रेम मिळत असत.. त्या त्या प्रसंगात आपली काळजी तो किंवा ती घेत असते.. मग अशा ह्या आयुष्यभराच्या सोबतीची निवड करताना आपण खूप उत्सुक आणि तितकेच दुहेरी विचारात असतो.. आपली निवड चुकली तर,एक निरागस असं नात आपल्यात तयारच झालं नाही तर.. असे किती तरी प्रश्न तेव्हा आपल्याला पडत असतात..

          पण ह्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर आपल्याला आपलं मनच देत असत. म्हणून तर आपण फक्त त्याच एका व्यक्तीकडे आकर्षित होतो जो आपल्या मनाला मनापासून आवडतो,त्याच वागणं ,त्याच बोलणं हे सगळच आपल्याला आवडू लागत; आणि तेव्हाच आपण त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी आपला सोबती करतो. त्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करताना आपण फक्त त्या व्यक्तीच्या मनाचा विचार करत असतो. आणि त्यातही आपली निवड बरोबर ठरली तर  स्वर्गसुख मिळाल्यासारखा आनंद आपल्याला होतो. पण तेच जर आपली निवड चुकली तर आयुष्यभराचं दुख आपल्या पदरी पडल्यासारखं आपल्याला वाटायला लागत.

          खरं तर, आपली निवड चुकलेली नसतेच, आपण त्या व्यक्तीला समजून घेण्यात चुका करत असतो; प्रेमात आपण इतके भान हरवतो की,आपली आवड आणि समोरच्याची आवड हयात फरक असू शकतो हे आपण पूर्णपणे विसरून जातो आणि आपलंच म्हण कसं बरोबर आहे हे मग आपण पटवून द्यायला  लागतो. आणि असं ही काही नसत की, दरवेळी चूक आपलीच असते; समोरची व्यक्ती सुद्धा चुकत असते, मग ती ही आपल्याला समजून घेत नाही असं म्हणून आपण एकमेकांशी बोलणं बंद करत जातो आणि ह्याचा परिणाम सहाजिकच आपल्या नात्यावर होतो. हळू हळू नात्यात दुरावा यायला सुरुवात होते आणि काही दिवसात आपलं नातं संपून जात.

          ह्यासगळ्यात चूक आपण निवडलेल्या व्यक्तीची नसते, आपण आपल्याला हवी असणारी,आपल्या मनाला पटणारी,आवडणारीच व्यक्ती निवडत असतो; पण आपण नात्यात आल्यावर प्रत्येक गोष्टीला घाई करत जातो.. एकमेकाना समजून घेण्याआधीच वचनबद्ध होऊन बसतो,समोरच्याला काय आणि कसं आयुष्य हवं आहे हे जाणून घेण्याआधीच आपण भावनिक होऊन नातं पुढे नेतो. आणि खरं तर इथेच आपण चुकतो..

जोडीदाराला समजून घेत, त्याच्या किंवा तिच्या  नेमक्या आयुष्याकडून आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे समजून घेणं आपलं पहिलं काम असलं पाहिजे. हळू हळू त्या व्यक्ती सोबत वेळ घालवत त्याची किंवा तिची आवड जाणून घेत प्रेम केलं तर त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तिचं एखाद्या गोष्टीवर असणारं मत हे सगळच कळून जात आपल्याला जाऊन.. आपल्याला गरज असते ते फक्त नात्याला थोडा वेळ देण्याची.  आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जसं विचार करण्याचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे त्या व्यक्तीलाही तिचे काही विचार, काही मत आहे समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने आपलं नात घट्ट होत जात. त्याचबरोबर नात्यात संवाद असेल तर कुठल्याही परिस्थितीत आपण एकमेकांच्या सोबत उभे असतो.. कारण संवादाने होत असेल तर  झालेले गैरसमज दूर होतात आणि एकमेकांशी बोलून मनही मोकळं होत. एकेमकांविषयीच प्रेम हे संवादाने वाढत जात.

          एखादं नवीन नात हे फक्त विश्वासावर टिकून असत त्यामुळेच प्रेमाच्या नात्यात विश्वास हा खूप महत्वाचा असतो. पण त्याचबरोबर तो विश्वास कायम टिकवून ठेवणंही तितकंच गरजेच असत.. ह्या सगळ्या साध्या गोष्टी जरी जपल्या तरी आपला आयुष्यभराचा सोबती कायम आपल्या सोबत राहिलं.. आणि त्या व्यक्तीसोबत असणारं आपलं नातही अजून खुलत जाईल.  

 

 

-           मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या