आजकालच फसवं प्रेम..








          आजचा लेख ह्यासाठी लिहिला आहे, कारण आजकाल बरीच मुलं-मुली फक्त संधीसाधू प्रेम करतात,ज्या प्रेमाला काहीच अर्थ नाही..


आजकालच फसवं प्रेम..

          प्रेम म्हटलं की, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येत ते एक निरागस असं नात. ज्या नात्यात आपुलकी,काळजी,विश्वास असं सगळ असत.. पण आता ह्याचं प्रेमाची व्याख्या  बदललेली  पाहायला मिळते; आपल्या फायद्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीच्या पैशांसाठी आजकाल प्रेम केल्या जात.

          किती तरी मुलं-मुली असे आहेत जे फक्त काही तरी हेतू मनात ठेवून प्रेम करतात.  काही मुलं एखादी मुलगी चांगली दिसली, त्याला हवं ते करणारी असली की तिचा वापर करायचा म्हणून लगेच तिला प्रेमाची मागणी घालतात आणि असंच काही मुलीही; मुलगा दिसायला चांगला असला, तिचे प्रत्येक हट्ट पूर्ण करेल असा असला की, लगेच त्या मुलाच्या जवळ येतात..

           हयात प्रेम मुळात नसतच.. असते ती फक्त फसवेगिरी. कारण बरीच प्रेमाची नाती अशीही आहेत ज्यात फक्त शरीरसुखासाठी, एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जवळीक साधल्या जाते.. आणि मग अशा अर्थ नसल्याला नात्याला प्रेमाच नाव दिल्या जात..

          कित्येकदा असंही होत की, मुलगा किंवा मुलगी दोघांमधून एक खूप मनापासून प्रेम करत असतो तर दूसरा फक्त फायद्यासाठी त्या नात्यात असतो. आणि एकदा का तोच फायदा दुसरीकडे भेटला की, काही तरी कारण देऊन हळूच त्या नात्यातून काढता पाय घेतल्या जातो.. मग ह्याचा त्रास होतो त्याला, जो मनापासून नात्यात जिव्हाळा जपतो..   

          खरं तर, चूक ही मनापासून प्रेम करणाऱ्याचीच जास्त असते, सुरुवातीलाच समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याचं किंवा तिचं वागणं-बोलणं कसं आहे, विचार कसे आहेत,नेमकं नात्यात अपेक्षा काय आहे हे काहीच न बघता होकार दिल्या जातो. आणि त्यातही क्षणांत ह्या सगळ्या गोष्टी होतात; म्हणजे कुठलाचं विचार न करता निर्णय घेतल्या जातो..!  मग ह्याही पुढे जात मनाला न पटणाऱ्या पण प्रेम आहे म्हणून किती तरी गोष्टी केल्या जातात.  खरंच ह्याला प्रेम म्हणावं का..?

       पैशासाठी, चार सुखाच्या क्षणांसाठी जर एखादी व्यक्ती असं करत असेल तर त्याला प्रेम कसं म्हणणार ..?

          ह्यातही भरीसभर म्हणजे बऱ्याचदा समोरच्याचा हेतु कळत असूनही काहीच न करता; आहे ते सुरू ठेवल्या जात..  म्हणजे तेव्हा तर सरळ सरळ  गरजेपुरत नात आहे; हे माहीत असूनही त्या नात्यातून मुलं मुली बाहेर पडत नाही किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करत नाही. कारण फक्त हेच की, ती व्यक्ती सोडून गेली तर.., मला दुसरं कोणी भेटलंच नाही तर..

          अशा नात्याला अर्थ तरी काय, ज्यात फक्त क्षणिक सुखाचा विचार केल्या जातो आणि नंतर अर्ध्या वाटेत वाट बदलल्या जाते.

          प्रेम म्हणजे बाह्य आकर्षण कधीच नसत, एखाद्याचं मन पाहून जे प्रेम केल्या जात तेच प्रेम शेवटपर्यंत टिकून राहत. आणि अशा प्रेमात फक्त निखळ प्रेमाची अपेक्षा बाळगलेली असते. एखाद्याला समजून,त्याच्या मनाचा विचार करून, कोणता हेतु मनात न ठेवता एखादं नात स्वीकारलं; तर ते नात नक्कीच यशस्वी होत. त्या नात्यात दुरावा नावाचा शब्दच येत नाही कधी..  कारण, विचार, भावना आणि चांगल्या मनाचा माणूस पाहून ते प्रेमाचं नात जोडलेलं असत.  म्हणूनच एखादं नात निवडताना भावनेच्या आहारी न जाता, खरंच ती व्यक्ती योग्य आहे का ह्याचा विचार एकदा तरी  नक्कीच केला पाहिजे.

 

                         - मराठी लेखणी  

 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)