सुंदरता..

                

                 “मनाची सुंदरता ही शारिरीक सुंदरतेहून मोठी असते”.



आजचा लेख ह्यासाठी कारण, माणसाचा समोरच्याला बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त बाह्य सुंदरतेवर अवलंबून राहिला आहे.. 

    सुंदरता.. 
        
            एखाद्याच्या दिसण्यावरून त्याची पात्रता ठरवणं ही आजकाल साधारण बाब झाली आहे. जन्मापासून प्रत्येकालाच हे सांगितल्या जात की , चांगल्या दिसणाऱ्या सोबतच मैत्री करा. पण कधी कोणी हे म्हणत नाही,मनाने चांगल असलेल्या व्यक्तीसोबत मैत्री करा.. माणसाची बुद्धी ह्या बाबतीत कमकुवतच राहते. समोरचा बुद्धीने कितीही हुशार असला, मनाने कितीही चांगला असला तरी,शेवटी त्याला  कुठेतरी नाकारल्या जात कारण फक्त हेच की,त्याच दिसणं.. आणि ह्या गोष्टी फक्त मुलं किंवा  मुली अस एकाच्याच बाबतीत होत नाही. ह्या एका गोष्टीत नक्कीच समानता आहे समाजात.. मुलगा असो किंवा मुलगी दिसण्यावरून,रंगावरून प्रत्येकालाच मानसिक त्रास दिल्या जातो.

          आपण एखाद्याला त्याच्या दिसण्यावरून बोलून सहज मोकळे होतो,पण त्याच्या मनात किती खोलवर ह्या गोष्टी रुजून बसत असतील ह्याचा कोणीच विचार करत नाही.. एखाद्याच्या दिसण्यापेक्षा त्याच्यातले चांगले गुण बघणं काय वाईट आहे.. मनाची सुंदरता महत्वाची असते हे फक्त पुस्तकात वाचायचं पण प्रत्येकक्षात मात्र त्याचा वापर न करणं ह्याला काहीच अर्थ उरत नाही..!

       समोरच्या व्यक्तीच दिसणं हे गरजेच नसत तर त्याची ओळख ही त्याच्या मनाने, त्याच्या वागण्याने,त्याच्या बुद्धीने होत असते. पण एखाद्याच्या रंगावरून त्याला एखाद्या गोष्टीत सहभागी न करून घेणं, सतत त्याचा अपमान करणं, हे कितपत योग्य आहे..? माणसाच अस्तित्व हे त्याच्या कर्तुत्वावर अवलंबून असत. आणि आपण एखाद्याला दिसण्यावरून बोलतो तेव्हा कधीतरी हा देखील  विचार मनात करायला हवा की, कधी-कधी चांगली दिसणारी व्यक्ती ही केवळ दिसायला चांगली असते,पण मनाने किती तरी कुरूप असते.  सुंदरता ही वागण्यातून दिसते, बोलण्यातून जाणवते,आणि वेळेनुसार समजते. पण ती समजेपर्यंत आपण अनेकांची मन दुखावून बसलेलो असतो. म्हणून वेळीच बुद्धीचा थोडा वापर केला तर माणसाची खरी सुंदरता कोणती हे सहजच कळून जात.

          शारीरिक सुंदरता ही फक्त चार क्षणांची असते,आज आहे तर उद्या नाही.. पण मनाची सुंदरता मात्र चिरकाल टिकवता येते. मग हे सर्वस्वी आपल्या हातात असत की, कोणाला कसं आणि किती सुंदर म्हणायचं..

          “ मनाची सुंदरता ही शारिरीक सुंदरतेहून खरंच खूप मोठी असते”.

 

-           मराठी लेखणी 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या