“ सुरू असतो शोध नेहमीच नव्या वळणाचा,
कधी अपघाताने तर कधी स्वतःहून मिळतो
रस्ता नव्या वाटेचा ”.
आजचा हा लेख म्हणजे,आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर समोर येणारी नवी पाऊलवाट..
आयुष्याची पाऊलवाट..
वर्तमानात
रमताना प्रत्येकालाच भविष्याची चाहूल लागते. कधी काळजीपोटी तर कधी हव्यासापोटी.. पण
ओढ मात्र सगळ्यांना असतेच पुढच्या वाटचालीची.. जसा एक नियमच असतो; भविष्याची तयारी
ही वर्तमानाच्या सुरुवातीलाच करावी लागते..! त्याला कारणही तसंच असत म्हणा,आपलं अस्तित्व
जोपर्यंत आपण तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला जगाच्या व्यवहारात किंमत येत नाही. आणि
एकदा ही किंमत मिळाली की,मग पुन्हा नवी परीक्षा असते ती म्हणजे,मिळालेली किंमत टिकवून
ठेवण्याची.. जगाच्या ह्या व्यवहारात प्रत्येकालाच आपली पाऊलवाट सतत बदलावी लागते. कारण
वेळेनुसार सगळ्याच गोष्टी बदलत जातात. मग अशात आयुष्याची पाऊलवाट एकच कशी राहणार ना..!
तिलाही बदलाव लागतच..
परिस्थिती
जशी नवीन वळण घेते अगदी तसच आयुष्यही नवीन वळण घेत असत. शिक्षण घेताना आयुष्यातले वळण
हे भविष्याकडे नेतात आणि त्याहूनही पुढे करियर करताना येणार प्रत्येक वळण वर्तमान आणि
मरेपर्यंतच सगळं आयुष्य घडवत. तेव्हा मग काही चुका होतात तर काही चांगल्या गोष्टी घडून
जातात. त्याचप्रमाणे काही माणसंही आयुष्यात येतात; त्यातही काही वेळेनुसार पडद्याआड
जातात तर काही कायमसाठी सोबती होऊन जाता..
आयुष्यात
येणारं प्रत्येक वळण प्रत्येकाला काही तरी शिकवून जातच,जगण्यासाठी नवी आशा देत. वयाच्या
प्रत्येक प्रसंगात अशी एखादी पाऊलवाट भेटतेच आपल्याला जी आपल्या आयुष्याचीच पाऊलवाट होऊन जाते. त्या वळणावरून आपलं सगळं आयुष्य
एकतर चांगल होत नाही तर वाईट होत. पण वाट कोणतीही असली तरी आयुष्य मार्गी लावण्यासाठी
ती एक महत्वाची भूमिका बजावत असते. नकळतपणे आपल्याला आधार देत असते. पण ह्या आयुष्यात
येणाऱ्या अगणित वळणाची जाणीव सगळ्याना होतेच अस नाही, ज्यांना होते ते त्या संधीच सोन
करतात. आणि ज्यांना होत नाही ते सगळच गमावून बसतात..
मिळालेली प्रत्येक संधी ओळखून पाऊल पुढे टाकत जाणं हेच फायद्याच असत. मग त्यातून तोटा झाला तरी निदान काही तरी शिकायला नक्कीच भेटत, जगण्यात एक खंबीरता येते पुन्हा नवीन पाऊलवाटेवर जाताना वेगळीच ऊर्जा वाटते . म्हणून नकळत येणाऱ्या वळणावर विचार करून पाऊल ठेवलं तर फायदा हा नक्की होतोच.. आणि नवनवीन वळणावर जाण्याची ही शोध मोहीम देखील मार्गी लागते, आयुष्याला एक नाव अर्थ देते ही शोध मोहीम.
- मराठी लेखणी
0 टिप्पण्या