आजची स्त्री,
प्रत्येक संकटाला तोंड
द्यायला सज्ज आहे..
आजची स्त्री,
पुरुषांच्या बरोबरीने पाऊल
टाकायला सज्ज आहे..
आजची स्त्री,
चारभिंतीच्या जाळ्यातून
बाहेर पडत
स्वप्नांची गगनभरारी
घ्यायला सज्ज आहे..
आजची स्त्री,
प्राणप्रतिष्ठा जपून
नावलौकिक
मिळवायला कायम सज्ज आहे...
- मराठी लेखणी
0 टिप्पण्या