“मनातले वादळ आणि वेळ ह्यांची जुळवणी करणं खूप गरजेचं असत”.
मनातले वादळ आणि वेळ..
कधी आकाशातल्या चांदण्यांसारखं लख्ख हसू ओठांवर असत, तर कधी अचानक सूर्याच्या रणरणत्या आगीसारखं डोकं ठणकत असत. कारण, दिवसभरात अशाच अनेक गोष्टी होऊन जातात ज्यामुळे माणसाच्या मनात वादळ निर्माण होत. कधी त्रासदायक, कधी अस्वस्थ करणार तर कधी शांत करणार.. मग ते कसं आणि कोणाला सांगावं हा प्रश्न निर्माण व्हायला लागतो. कारण आपल्याला छळणारी ही बाब समोरच्याला शुल्लक वाटणं साहजिकच आहे. त्याला पडणारे प्रश्न, त्याला वाटणारा त्रास, त्याच्या मनातली वादळं ही नक्कीच वेगळी असणार.. कारण त्याची मत ही पूर्णपणे वेगळी असणार.. ह्याच विचाराने मनातली खळबळ मनातच राहून जाते आणि मग एखाद्या दिवशी शुभ मुहूर्तासारखी ती अचानक बाहेर पडते. त्यावेळी मग समोरचा समजून घेईल नाही घेईल कशाचीही पर्वा नसते, आणि एकाचा राग दुसऱ्यावर अगदी सहज निघून जातो.. एकदाच वादळं शांत होत..!
पण ह्याचा परिणाम त्या व्यक्तीसोबतच्या आपल्या नात्यावर
व्हायला सुरुवात होऊन जाते, कारण
शेवटी माणूसच.. एखाद्याचं बोलणं नाही म्हटलं तरी मनाला लागतच आणि सोडून द्यायचं
म्हटलं तर ते पुन्हा पुन्हा नजरेसमोर
गिरट्या घालत..
आपलं मन तर आग ओकून केव्हाच शांत झालेलं असत,पण ज्याच्यावर आग ओकली त्याच मन मात्र आतल्या आत त्याला खात
राहत.. म्हणजे हे चक्र असच कायम सुरू राहत.. मग ह्याला थांबवायचं की वाढवायचं हे
कळण्या इतपत देखील आपण विचार करत नाही. अगदी साधीच
गोष्ट असते, मनातली घालमेल, न पटणारी एखादी गोष्ट तेव्हाच वेळेवर बोलून टाकली तर त्याचा
परिणाम हा अर्थात चांगलाच होतो. बऱ्याचदा न पटणारी गोष्ट अशावेळी एखाद्याला पटून
जाते.. आपल्या बोलण्यातली सकारात्मक बाजू समोरच्याला पटायला लागते. पण हे सगळं
त्या वेळी झालेलंच योग्य. नंतर कितीही प्रयत्न केला तरी मनाला बसलेला चटका लवकर
भरून निघेलच ह्याची शाश्वती कोणालाच देता येत नाही, म्हणून वेळ महत्वाचाही आहे. वेळेवर प्रत्येक गोष्ट लक्षात
घेऊन समोच्याला बोललं तर त्याच्या आणि आपल्या नात्यावर त्याचा परिणाम हा
सकारात्मकच होतो. पण तेच जर न बोलता कायम मनात ठेवत गेलं की,त्याचा त्रास अधिक होतो. आणि वेळ निघून गेली की, अचानक
रागात बोलून गेल्याने समोरच्या व्यक्तीच
मन दुखावल्या जात.
अशावेळी नात्यामध्ये दुरावा निर्माण
होतो, समोरची व्यक्ती अचानक शांत होऊन जाते आणि मनात नवीन वादळ चालू होत ते वेगळंच..
म्हणून वेळेवर बोलणं खूप गरजेच आहे. वेळेच महत्व अशावेळी कळणं जरा जास्तच गरजेच
असत. ह्यामुळे निदान मानसिक तणाव तरी आपल्यापासून दूर राहिलं .
- मराठी लेखणी
0 टिप्पण्या