लिव्ह-इन-रिलेशनशिप..




      हा विषय लिहिण्याचं कारण म्हणजे, लिव्ह-इन-रिलेशनशिपच्या नावाखाली अनेक लोक नात्यांचा गैरवापर करतात..

लिव्ह-इन-रिलेशनशिप..

            आपल्याकडे म्हणजे भारतात काही वर्षांपूर्वी लिव्ह-इन-रिलेशनशिपकडे चुकीच्या नजरेने पाहिल्या जात होत. कारण, एकतर ही आपली परंपरा नाही म्हणून तर दुसरं म्हणजे ह्या गोष्टीमुळे नात्यांना अर्थ राहत नाही म्हणून.. पण आता परिस्थिती थोडी वेगळी झालेली आहे; मोठ्या प्रमाणात लोकं लिव्ह-इन-रिलेशनशिपकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लागले आहेत. पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात ही गोष्ट वाढत आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लिव्ह-इन-रिलेशनशिपच्या नावाखाली नात्यांचा गैरवापर सुद्धा वाढत आहे.

            लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, ते सोबत राहत असतात. कारण, पुढे त्यांना लग्न करायचं असत आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी म्हणून ते सोबत राहत असतात..  ह्यात चुकीच असं काही नाहीये खरं तर..    पण एकमेकांना समजून घेण्यासाठी हे कारण देऊन सोबत राहणारी बरीच लोकं नंतर लग्न करण्याची वेळ आल्यावर पटत नाही, विचार जुळत नाही, ह्या गोष्टी आवडत नाही, तेच आवडत नाही ही कारण देऊन अगदी सहज वेगळी होतात.. मग अशा ह्या लिव्ह-इन-रिलेशनशिपला अर्थ तरी काय, ज्यातून पुढे दोघांचे रस्ते वेगळेच होणार आहेत..?

            आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून आवडायला लागते तेव्हा आपण त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट जवळून जाणून घेत असतो, त्या व्यक्तीचा स्वभाव,बोलणं,विचार,आवड आणि मग कुठे आपण त्या व्यक्तीला आपल्या मनातलं बोलतो. म्हणजे सगळा विचार करूनच आपण मनातली गोष्ट बोलत असतो. आणि रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर प्रत्येकच व्यक्ती ही समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवत असते. मग असं असताना दोघांमधून एकाने लग्नाचा विषय काढल्यावर लिव्ह-इन-रिलेशनशिपचा आधार का घेतल्या जातो..?

            खरं तर, लिव्ह-इन-रिलेशनशिप म्हणजे दोन व्यक्तिंनी सोबत राहणं हेच असत फक्त.. कारण, त्या व्यक्तीला जाणून घेतल्यानंतर किंवा नीट समजून घेतल्यानंतरच आपण मनातलं बोलत असतो. आणि एकदा प्रेमाची कबुली दिल्यानंतर असा बराच वेळ भेटतो जेव्हा आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो, निदान तेवढ्या वेळेत आपल्याला हे नक्कीच कळत असत की, आपण आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत राहू शकतो की नाही..   मग असं असताना फक्त लग्नाचा विषय टाळण्यासाठी म्हणून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणं हे नक्कीच चुकीच आहे. आणि लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहून झाल्यानंतर पुन्हा लग्नाचा विषय निघाल्यावर नवीन कारण देऊन सोडून दिल्या जात. हे सुद्धा तितकंच चुकीच आहे..  ह्यामुळे दोघांमधला मनापासून प्रेम करणारा एक व्यक्ती पूर्णपणे दुखावल्या जातो. आणि जो सोडून जातो तो पुन्हा असंच काही करून अजून कितीतरी लोकांना दुखावतो.

            ज्याला असं वाटत की, लिव्ह-इन-रिलेशनशिप हे एकमेकांना समजून घेण्यासाठी म्हणून केल्या जात तर त्या व्यक्तीने एकदा हा विचार नक्कीच केला पाहिजे की, मग इतके दिवस आपण काय केलं..? आपण त्या व्यक्तीला समजून घेतलं नाही का.?, आणि समजून घेतलं असेल तर केवळ ‘पाश्चयात संस्कृतीचं अनुकरण करण्यासाठी म्हणून, आपण आपली संस्कृती सोडणं योग्य आहे का..!’ आणि त्या गोष्टीचं अनुकरण करून आपण आपल्या लोकांना दुखावणं हे किती योग्य आहे.

 

            -मराठी लेखणी

 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या