मनातल्या कोणत्याच भावना कधीच कोणाकडेच व्यक्त न करणारी काही माणसं..




मनातल्या कोणत्याच भावना कधीच कोणाकडेच व्यक्त न करणारी काही माणसं..

      आपल्या आयुष्यात बरीच लोकं अशीही असतात जी कधी प्रेम व्यक्त करतच नाही.. म्हणजे आपल्या आईवरचं प्रेम,मित्रावरच प्रेम किंवा मग आपल्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरच प्रेम..  असं काही प्रेम भावना त्या व्यक्ती कधी व्यक्तच करत नसतात.. आणि फक्त प्रेम भावनाच नाही तर अशा व्यक्ती मनातला राग सुद्धा कधी व्यक्त करत नसतात.

      त्या व्यक्तींच असं वागण्यामागे दोन कारणं असू शकतात, एकतर त्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग झालेले असतील की, त्यानंतर त्यांनी व्यक्त होणं सोडून दिलं असेल.. म्हणजे कोणी ऐकूनच घेतलं नसेल, किंवा प्रेम व्यक्त करूनसुद्धा समोरून त्या भावनेला हसून सोडून दिल्या गेलेलं असेल, कधी तरी राग व्यक्त केल्यावर त्या रागाच खरं कारण कोण समजून घेतलेलं नसेल.  आणि दुसरं कारण म्हणजे, त्या व्यक्तींचा स्वभावच तसा असेल.. म्हणजे काही व्यक्ती ह्या शांत किंवा आपल्या मनातलं आपल्याच मनात ठेवणाऱ्या सुद्धा असतात.. कारण, त्यांना नेमकं व्यक्त कसं व्हायचं हेच कळत नसत..

      तसच काही अशीही लोकं असतात ज्यांना कोणत्याच व्यक्तीबदल आपलेपणा वाटत नसतो, किंवा प्रेम वाटत नसत. म्हणजे अशा व्यक्तींसमोर कितीही प्रेम करणारी व्यक्ती असली तरी ती व्यक्ती तितकं आपलेपणाने समोरच्या व्यक्तीसोबत वागत नसते. एकतर त्यांच्या अशा वागण्याला त्यांचा भूतकाळ कारणीभूत असू शकतो नाहीतर मग कोणत्याच भावनेत किंवा कोणत्या भावनिक नात्यात  त्यांना अडकून राहायला आवडत नसेल म्हणून ते असं वागत असतील.. आणि अशा व्यक्तींना आपण कितीही प्रेमाने वागवलं तरी त्या त्यांचा स्वभाव सोडत नसतात..

      खरं तर एखाद्या व्यक्तीबदल किंवा आपल्या जवळच्या माणसांबदल आपल्याला प्रेम तेव्हाच वाटत असत. जेव्हा आपण त्या व्यक्तींबदल मनाने विचार करत असतो. किंवा आपण त्या व्यक्तीवर भावनिक दृष्ट्या अवलंबून असतो. आपल्याला वाईट वाटल्यावर जसं आपण कोणत्यातरी अशा व्यक्तीशी बोलतो जी व्यक्ती आपलं म्हणं समजून घेऊ शकते, आपण ज्यांना हक्काचं मानत असतो त्यांच्यासोबतच आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असतो. आणि जी लोकं आपलं मन कधीच कोणाकडे व्यक्त करत नाहीत ती मग अशी एकटी राहणारी किंवा मनातच सगळं दडवून ठेवून, भावनिक दृष्ट्या कधी कोणावर अवलंबून नसणारी लोकं असतात. आणि अशा लोकाना आपण समजून कधीच सांगू शकत नाही कारण त्यांचा स्वभावच तसा झालेला असतो की, आपण तो कधीच बदलू शकत नाही.  

 

            - मराठी लेखणी 

 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या