प्रेमाचा बंध..





प्रेमाचा बंध..

 

क्षणांचे तास होतात,

तासांचे दिवस आणि दिवसांची वर्ष होत राहतात..

पण ह्या एक एक दिवसात,

तुझ्या सहवासात

तर कधी तुझ्या आठवणीत

दिवसही क्षणांत सरतात..

 

असाच एक एक क्षणांचा मिळून झालेला दिवस

आणि ह्या प्रत्येक दिवसांत झालेली रात्र

रोज मला तुझ्या आठवणींच्या,

तर कधी तुझ्या स्वप्नांच्या किनाऱ्यावर घेऊन येते..

 

ह्याच सहवासाच्या सुरेख मैफिलीत

आता पाहता पाहता हेही वर्ष सरत येईल,

अशीच अजून येणारी वर्षही जगूया..

एकमेकांचे राहून नव्याने

आपल्या प्रेमाचा बंध उलगडुया...

 

    - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या