आयुष्य म्हणजे..






 

आयुष्य म्हणजे..

 

आयुष्य म्हणजे कधी लोकांच्या

अर्थहीन प्रश्नांची सरबती,

तर कधी जगण्याला

अर्थ देणाऱ्या सुखाची भटकंती..

 

आयुष्य म्हणजे कधी वेळेनुसार बदलणारी नाती,

तर कधी आपल्याच विश्वात रमलेलं असताना

अचानक समोर येणाऱ्या भुतकाळाची भीती..

 

आयुष्य म्हणजे कधी भविष्य

सुधारण्यासाठी केलेली धडपड,

तर कधी वर्तमान घडवण्यासाठी

केलेली पळपळ..

 

शेवटी, आयुष्य म्हणजे कधी

हातात काहीच नाही म्हणून रडत बसणं,

तर कधी हातात जे आहे

त्यात समाधानी राहून हसत-खेळत जगणं... 


 

      - मराठी लेखणी

 

 


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या