आयुष्य एक स्वप्न..

 


आजचा हा लेख म्हणजे प्रत्येकाने पाहिलेली स्वप्न.. , आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर पडणारी स्वप्न ही वेगळी दिशा देतात जगायला. 


    आयुष्य एक स्वप्न..


          माणसाचं आयुष्य म्हणजे स्वप्नच असत. लहान असताना अविचारी बुद्धी वाटेल ते स्वप्न पाहत असते. आणि चुकून त्यातलं एखादं स्वप्न खरं झाल; मग तर काही विचारायलाचं नको ! विचारांची कसली गाठभेट नसताना मनात येईल ते स्वप्न बघणं चालू असत त्या कोवळ्या वयात..

          त्या वयात मग कानावर पडणारे, तर कधी आई वडील बोलताना मनात आलेले अनेक स्वप्न असतात. त्यात अजून भर पडते ती, घरी आलेल्या पाहुण्यांची.. समोर लहान मूल दिसल की त्याला काय विचारू आणि काय नको असं होत ह्या पाहुण्याना..! त्यात त्यांचा पहिला प्रश्न तर हा ठरलेला असतो, काय होणार मोठं झाल्यावर..? आधीच ह्या नवनवीन सुचणाऱ्या स्वप्नांनी डोक्यात काहूर माजवलेलं असत त्यात भरीसभर म्हणून हे प्रश्न.. मग सुरू होते जरा मोठी स्वप्न बघण्याची तयारी, मग आई-बाबांकडे मी डॉक्टर होणार..,मी इंजीनियर होणार..,आणि एक ठरलेलं ते म्हणजे मी पायलट होणार.. खरंच त्या लहान वयात ह्या शब्दांचा साधा अर्थही आपल्याला माहीत नसतो. पण आपली स्वप्न म्हणजे जणू काही चप्पल चोराने पाहिलेलं कोहिनूर हिऱ्याच स्वप्न.. आणि आपल मुलं इतक्या लहान वयातच डॉक्टर, इंजीनियर व्हायच म्हणत आहे म्हटल्यावर आई बाबांना आनंद होऊ लागतो. पण आपल्याला मात्र हळू हळू परिस्थिति कळू लागते, आपण जसं जसं मोठ होत जातो तसं तसं आपण अजून नवीन स्वप्न पाहू लागतो.

          तेव्हा खरं तर कळू लागत की, आपली आवड आणि आपल्याला पडणारी अगणित स्वप्न हयात सतत बदल होतोय. मग अखेर असंख्य स्वप्नातून बाहेर येत पुन्हा एक स्वप्न पहिल्या जात,पण ह्या वेळी हे स्वप्न आपल्या आवडीच असत. त्यात ना कोणाचा अस्तक्षेप असतो ना जबरदस्ती.. मग पाहिल्याला स्वप्नाला पूर्ण करण्याचा ध्यास मनी लागतो. पण म्हणतात ना, “आपलं मन हे फुलपाखरसारखं असत”, गगनभरारी घेणं त्याला आवडत असत. आपल्या आवडीच्या स्वप्नात हजारो रंग भरण्यासाठी ते पुन्हा नवनवी स्वप्न बघत राहत. काही पूर्ण करत तर काही मृगजळासारखे हातातून सोडून देत. पण स्वप्न पाहायचं काही सोडत नाही..

          आणि सोडाव तरी का? आयुष्यात आनंद , सुख ,समाधान मिळवायचं असेल तर स्वप्न ही पाहिलीच पाहिजेत. कारण,आयुष्य तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण स्वप्न  बघत नाही,ती पूर्ण करायला धडपडत नाही.. शेवटी, “आयुष्य म्हणजे एक सुरेख अशा स्वप्नांचा खजिनाच तर आहे”.

 

                                                 - मराठी लेखणी 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. सुंदर लिहलंस.. खरंतर ही मनाची घालमेल विशिष्ट वयात येतंच असते. अन आपल्याला स्वतंत्र विचार नसतो. आपण फक्त वाहत असतो फुगलेली भौतिकता पाहून. यातला संभ्रम सुद्धा स्वाभाविक असतो. पण हृदयातून आवड निर्माण झाली एखाद्या गोष्टीबद्दल त्या गोष्टीकडे आपण झुकू लागलो की त्यात यश निश्चित मिळतं. मात्र यासाठी आपल्या आतला आवाज ऐकायला हवा. अन्यथा विना उद्दिष्ट असलेलं आयुष्य म्हणजे समुद्रातील विना दिशेची होडीच...! छान प्रयत्न

    उत्तर द्याहटवा
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)