किती दिवस असं स्वतःच्या मनाविरुद्ध वागायचं आहे तुला..?




किती दिवस असं स्वतःच्या मनाविरुद्ध वागायचं आहे तुला..?

 

कधी कोणाच्या इच्छेसाठी,

तर कधी लोकांच्या भीतीपोटी

किती दिवस असं

स्वतःच्या मनाविरुद्ध वागायचं आहे तुला..?

 

कधी उद्या समोर येणाऱ्या

वाईट प्रसंगाच्या धास्तीने घाबरून,

तर कधी आपल्या आयुष्याचा दोर

दुसऱ्याच्या हातात देऊन

किती दिवस असं

स्वतःच्या मनाविरुद्ध वागायचं आहे तुला..?

 

कधी मनातल्या अपेक्षांचा भंग करून,

तर कधी आधीपासून चालत आलेल्या

अविचारी परंपरांना उराशी धरून

किती दिवस असं

स्वतःच्या मनाविरुद्ध वागायचं आहे तुला..?

खरंच, अजून किती दिवस असं

ह्या अर्थहीन परिस्थितीत

झुरायचं आहे तुला..?

 

            -मराठी लेखणी

 

 

 

 

 

 

 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या