तू पुढे चालत राहा..







तू पुढे चालत राहा..

 

कितीही अवघड वळण तुझ्यासमोर आलं

तरी त्या अवघड वळणावर,

तू जिद्दीने पुढे चालत राहा..

 

असतील तुझ्याही समोर अनेक वाईट प्रसंग

पण त्या प्रत्येक प्रसंगात,

तू हिंमतीने पुढे चालत राहा..

 

भेटतील तुलाही अशी माणसं

जी सतत तुला मागे खेचतील,

तेव्हा त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करून

तू खंबीरपणे पुढे चालत राहा..

 

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर

स्वतःचा प्रवास स्वबळावर करत,

तू फक्त पुढे चालत राहा..


मनाने जेव्हा कमकुवत पडशील

तेव्हा स्वतःला आधार देत,

यशाचं शिखर गाठेपर्यंत

तू कायम पुढे चालत राहा...

 

-मराठी लेखणी


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या