विचारांचं चक्र...
विचारांचं चक्र काही केल्या थांबत नाही. वेळ मिळेल तेव्हा , वाट सापडेल तस ते सुरूच राहत. कळत नकळत पण आपण सगळ्याच गोष्टी मनावर घेतो. काही वेळा आपल्याला विसरायचं असत पण आपली बुद्धी आपल्याला ते विसरू देत नाही. अधिराज्य गाजवून असते ती आपल्यावर.. विचार करून काही गोष्टी लक्षात येतात ,काही चुका समजतात मग आपण त्या सुधारतोही पण शेवटी एक वाक्य येतच ते म्हणजे मीच समजून घेतलं.. खरंच घेतो आपण समजून समोरच्याला? नाही...अजिबात नाही.. आपण राग विसरतो ,आपण विचार बदलतो पण समजून घेतलेलं असत म्हणून नाही तर ती व्यक्ती आपल्यासाठी खास असते म्हणून.. तिच्या समोर राग काहीच नसतो म्हणून..
असंच असत विचारांचं हे चक्र नीट सोडवलं तर सुटतं नाहीतर आपल्या हातून सगळं सोडवत..आपली माणसं ,नाती सगळं.. आपला आपल्या विचारांवर ताबा राहत नाही ,मन शांत राहत नाही.
विचार तर आपण थांबवू शकत नाही पण निदान त्यातून बाहेर पडायचं असेल तर आधी स्वतःला समजून घेता आलं पाहिजे. जोपर्यंत स्वतःला समजून घेत नाही तो पर्यंत आपल्या समोरच्या व्यक्तीकडून काय अपेक्षा आहेत हे कसं कळेल... विचारांचं चक्र योग्य दिशेला न्यायचं असेल तर आपल्यातल्या माणसाला समजून घेणं गरजेचं आहे..

- मराठी लेखणी
1 टिप्पण्या
💯
उत्तर द्याहटवा