असं का ?
प्रेम करतांना का आपल्या मनात असंख्य प्रश्न असतात . आपल्याला जमेल का प्रेम निभावणं ,होईल का सगळं नीट आणि ह्याहून महत्वाचं आपण का लोकांचा विचार
करतो ,लोक काय म्हणतील , काय आणि कसा विचार करतील आपल्या बद्दल ...? मला हे कळतं नाही प्रेम लोकं करणार असता कि तुम्ही ?
बाकी गोष्टीत तुम्ही कधीच लोकांचा विचार करत नाही मग प्रेम करतांनाच का ?
प्रेम करायचं आहे तर मनापासून करा ना , आणि खरंच जर असेल कोणावर प्रेम तर काय गरज आहे लोकांचा विचार करण्याची ... प्रेम करायचं तुम्हाला ,ते शेवट पर्यंत टिकवायचं कि नाही हे ठरवणार तुम्ही , आयुष्यभर त्या व्यक्ती सोबत राहणार तुम्ही ;मग का आणि कशासाठी लोकांचा विचार करायचा ? असं का होत कि नेहमी प्रेम करणाऱ्यांनाच त्रास सहन करावं लागतो ,एका निस्वार्थ नात्यासाठी का त्यांना एवढा त्रास सहन करावा लागतो ...
आणि प्रेम हे खरं अगदी मनापासून असलं
पाहिजे ,दोघे एकमेकांवर खरं प्रेम करणारे पाहिजे नाही तर एक करतो दुसऱ्याला काही घेणं देणं नाही असं नको . प्रेम हे खूप छान आणि सुंदर नातं असत त्यामुळे ते मनापासून निभावणं हे आपलं कर्तव्य असत आणि खरंच असेल ना प्रेम कोणावर तर करावं प्रेम पण ते निस्वार्थ असावं.. पण समोरच्याने प्रेम केलंच पाहिजे हि अपेक्षा नको .कारण प्रेम हि निस्वार्थ भावना आहे .. स्वतःसाठी प्रेम करा लोकांसाठी प्रेम नका करू ..
- मराठी लेखणी
5 टिप्पण्या
Nice one..well try
उत्तर द्याहटवा😊Thanks
हटवाKeep it up ♥️
उत्तर द्याहटवा😊
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा