आपल्या आयुष्यात जेव्हा एखादं अनपेक्षित वळण येत..





आपल्या आयुष्यात जेव्हा एखादं अनपेक्षित वळण येत..

 

      आपण रोजच्या कामात इतकं व्यस्त असतो की, आपल्या समोर काही गोष्टी घडत असतात पण नकळत आपलं त्याकडे दुर्लक्ष होत असत. आणि मग एक दिवस अचानक एखाद्या वादळासारखं त्या दुर्लक्षित गोष्टींचं एक अनपेक्षित वळण आपल्या आयुष्यात येत..

      मग काय करावं..? कोणाला सांगावं..? त्यातून बाहेर कसं पडावं..? काहीच कळत नसत इतक्या अचानक सगळ्या गोष्टी होतात..

      ह्या सगळ्यात आपलं डोकं कमी पण मन जास्त दुखावल्या जात असत. कारण, घडलेल्या त्या गोष्टी आपल्या मनाशी, आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात. आणि मग आपल्या मनाला लागलेली एखादी गोष्ट सहज आपल्या मनातून जात नाही. परिणामी, ह्याचा त्रास आपल्याला तर होतोच पण आपल्या जवळच्या लोकानासुद्धा ह्या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो.

      आता आपल्या आयुष्यात येणारं हे अनपेक्षित वळण फक्त प्रेमातच येत असं नाही; कधी कधी मैत्री, किंवा अजून एखादं नात ह्यातही येउच शकत. कारण, आपल्या जवळ असणारी माणसं ही खरंच आपल्या जवळची असतीलच असं नसत ना..!

      कधी कधी गरज म्हणून आणि महत्वाचं म्हणजे स्वार्थ म्हणून काही लोकं आपल्या आयुष्यात असतात. आणि हीच लोकं रोज आपल्या सोबत असूनसुद्धा आपल्या सोबत नसतात. पण आपण मात्र विश्वासाची पट्टी डोळ्यावर ठेवून फिरत असतो. म्हणून मग कितीही चुका दिसत असल्या समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात तरी ती व्यक्ती असं वागणारच नाही असं समजून आपण त्यांच्यासोबत असतो.

      मग अचानक कोणी असं वागलं की, आपण पूर्णपणे खचून जातो.  कारण, आपल्या अत्यंत जवळच्या लोकानी आपला विश्वास तोडलेला असतो. आपल्याला किती तरी प्रश्न पडलेले असतात की, समोरची व्यक्ती असं का वागली..?. काय चुकलं आपलं..? पण त्या एकही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही, कारण त्या प्रश्नांची उत्तर जी व्यक्ती देईल ती व्यक्तीच आपल्याला त्या प्रश्नांसोबत एकटं सोडून गेलेली असते..

      आणि मग जर ती व्यक्ती असंच आपल्याला एकटं सोडून जात असेल तर त्या व्यक्तीसाठी म्हणून आपण स्वतःला त्रास करून घेत, आपलं आयुष्य नकळतपणे त्या व्यक्तीच्या हातात देत.. असं एकटं जगत राहण्यात काही अर्थच राहत नाही..

      म्हणूनच कोणाला आपल्या आयुष्यात इतकं पण जवळच करून नये की, त्या व्यक्तीच्या सोडून जाण्याने किंवा चुकीच वागल्याने आपलं आयुष्य खराब होईल. आपण आयुष्यभरासाठी त्रासात राहू इतकं कधीच कोणाला आपल्या जवळच होऊ देऊ नये.

 

            -मराठी लेखणी    


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)