मित्र..

आजचा हा लेख खास आपल्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तींसाठी.. अशी व्यक्ती जी आपल्याला जीवापेक्षा जास्त महत्वाची असते. त्या व्यक्तीशिवाय आपलं पानच हालत नाही.. ती खास व्यक्ती म्हणजे आपले खास मित्र-मैत्रिणी.. 

   

मित्र.. 

पाळण्यातले पाय बाहेर पडू लागले की,हळू हळू चाहूल लागते अक्षरांची. आईसोबत अ,आ,इ शिकताना भारी नवल वाटू लागत.. मग हळू हळू इवले इवले पावलं शाळेत जाऊ लागतात. शाळेतल्या पहिल्या दिवशी सगळ्यानांच रडू येत. पण आपल्यासारखे आपल्या वयाचे मुलं मुली बघून त्यांच्यात रमायला होत.. मग खरी सुरुवात होते ती,शाळेच्या त्या वातावरणात स्वतःला सामावून घेण्याची.. इकडे तिकडे बघत शोध सुरू होतो आपल्यासारख्या आपल्याच वयाच्या कोणाचातरी.. आणि हा शोध अखेर संपतो तेव्हा; जेव्हा कोणीतरी आपल्यासारखी नवीन व्यक्ती आपल्याला भेटते.. मग रोज त्या व्यक्तीला भेटायच म्हणून शाळेत न जाण्याचा हट्ट आता दुरू होऊ लागतो. हळू हळू त्या अनोळखी व्यक्तीची ओळख होऊ लागते. त्या ओळखीसोबतच वयात वाढ होऊ लागते. मग त्या अनोळखी व्यक्तीला मित्र हे नवीन नाव पडत.. प्रेमाचं, आपुलकीच,हक्काच असं नाव..

वयाप्रमाणे मैत्रीच हे नात अधिकच घट होत जात. आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मित्राला किंवा त्या मैत्रिणीला सांगितल्याशिवाय चैनच पडत नाही. पण ते म्हणतात ना, एखाद्या नात्यात जोपर्यंत वाद होत नाहीत तोपर्यंत त्या नात्याच महत्व कळत नाही,अगदी तसच मैत्रीच असत. छोट्या मोठ्या गोष्टीवरून भांडण होतात.. ही भांडण ती व्यक्ती बाहेरची आहे म्हणून होतात अस नाही. तर ती होतात कारण, वयानुसार प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता विकसित होत जाते मग आपल्याला पटलेली एखादी गोष्ट आपल्याला मित्राला पटत नाही,कारण त्या गोष्टीवर ती व्यक्ती त्याच्या विचारानुसार विचार करते. मग न पटलेल्या गोष्टीवरून वाद चालू होतात. पण ह्या वादातून आलेल्या अबोल्यामुळे मैत्रीची किंमत कळू लागते. इतरांचे वेगळे विचार समजून घेण्याची क्षमता विकसित होऊ लागते. मग पुन्हा कटीची बटी होते. आणि मैत्रित नव्याने आपुलकी वाढू लागते.

लहानपणीचे हे मित्र मैत्रिणी कधी आपल्या आयुष्यभराचे सोबती होऊन जातात हे कळतच नाही. वेळेनुसार काही नवे मित्र मित्रिणी आयुष्यात येतात,काही लहानपणीचे मित्र दुरावतात. पण वेळोवेळी आयुष्यात कोणीना कोणी मित्र बनून येतच राहतं. आपली सुख-दुख, मनातल्या भावना व्यक्त होण्यासाठी ह्या मित्र मैत्रिणींची आवश्यकता असतेच. आई-बाबा,भाऊ-बहीण हे असले तरी,आपल्याला समजून घेणारे,प्रत्येक गोष्टीत साथ देणारे,हक्काने हसायला, रडायला लावणारे हे मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्याचे सारथीच असतात. जीवाला जीव देणारे हे मित्र आयुष्यभर खास असतात.

अशा आपल्या आयुष्यातल्या ह्या महत्वाच्या मित्र मैत्रिणीचा प्रवास फक्त तरूणपणीच आपल्याला लाभतो अस नाही. काही मित्र उतारवयातही आपल्या सोबत असतात. सोबत घालवलेल्या आयुष्यभराच्या त्या आठवणी काढत खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य हे मित्रच  खुलवतात.


                                               थोडं रुसायच, थोडं हसायच,

पण आयुष्यभर एकमेकांना जपायचं..

 

थोडं वर्तमानात, थोडं भविष्यात रमायचं,

पण आयुष्यभर एकमेकांना जपायचं..

 

थोडं तुझं,थोडं माझं ऐकायचं,

पण आयुष्यभर फक्त एकमेकांना जपायचं...




                                                             - मराठी लेखणी 

 

 

 

 

 

 

         

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)