“प्रत्येक व्यक्ती आपल्या दृष्टीतून स्वतःचा वेगळेपणा जपत असते”.
आजचा लेख म्हणजे, प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन..
दृष्टिकोन..
सतत
बदलत जाणारी एक अगणित गोष्ट आहे जगात ती म्हणजे माणसाचा दृष्टिकोन. प्रत्येक
गोष्टीत प्रत्येकाच एक वेगळं स्वतंत्र मत असत. आपल्याला पटलेली एखादी गोष्ट समोरच्याला
पटेलच असं नसत. त्याच्या दृष्टिकोनातून
कदाचित ती गोष्ट कमी किंवा जास्त महत्वपूर्ण असू शकते. पण म्हणून मग कोणीतरी एकच
व्यक्ती बरोबर असतो असं होत नाही. विचारांचा भाग असतो हा.. की, कोण कसा त्या बद्दल विचार करत असेल.
आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्या विचारांमध्ये फरक हा नक्कीच असतो. शेवटी त्यातच
तर प्रत्येकाच वेगळेपण दिसून येत. दोन वेगळ्या विचारांची किंवा वेगळ्या
दृष्टिकोनाची माणसं एकत्र येतातच ना..! कारण,समोरच्याचा तोच विचारातला वेगळेपणा
आपल्याला आवडलेला असतो. जसं आपल्या सारख्या विचारांची माणसं आजूबाजूला असतात अगदी
तसच वेगळ्या विचारांचीही माणसं आपल्याला भेटता. मग त्यांच्या आणि आपल्या विचारातली ही तफावत वेळेनुसार कमी होत जाते.
कारण हळू हळू आपण त्यांना समजून घ्यायला लागतो..
ह्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे, चंद्र..
काही ना चंद्र खूप सुंदर दिसतो. त्याच सौंदर्य पाहून अनेकांना त्याच्यातला प्रकाश,
त्याची शीतलता आवडते. पण ह्याच उलट अनेक लोकांना चंद्रातले काळे डाग दिसतात.
त्याचं कधी तरी समोर येणं आणि कधी तरी अचानकच निघून जाणं अनेकांना आवडत नाही..
म्हणजेच, एकाच विषयावर प्रत्येकाच एक वेगळं मत असत. आणि त्यामतानुसारच त्याचे
प्रत्येक निर्णय घेणं सुरू असत.
कधी कधी आपल्याला न पटणारी एखादी
गोष्टही आपल्याला करावी लागत असते,कारण आपल्याला समोरच्याच मन दुखवायचं नसत
म्हणून.. मग असाच हा दृष्टिकोन माणूस प्रत्येक गोष्टीत वापरुन रोजच नवनवीन गोष्टी
शिकतो. कधी जाणतेपणाने तर कधी अजाणतेपणाने.. ह्याच विभिन दृष्टिकोनातून माणूस नवीन
वाटचाली करत जातो. अत्यंत महत्वाचा असतो हा दृष्टिकोन,जो आपल्या आसपासच्या माणसाना
एकत्र जोडून ठेवतो. अर्थात समजूतदारपणे त्याचा स्वीकार केला तरच हे शक्य होत.
पण ह्या दृष्टिकोनातून प्रत्येकाच मन जपण वाटत
तितकं सोप अजिबात नसत, त्यातही आपली मत सांभाळून हे करण जरा जास्तच अवघड होऊन
बसतं. पण ह्यावरचा एक उपाय म्हणजे, जो जसा आहे त्याला तसं स्वीकारून पुढे जाणं..
म्हणजे त्याचही मन दुखावत नाही आणि आपलीही मत जपली जातात.. कारण एका दिवसात तर
व्यक्ती बदलत नाही.. आणि समजा, कोणाच्या दृष्टिकोनात चूक असेल तर ती वेळेनुसार
समोर येतेच. मग स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्यात काहीच वाईट नाही.
“प्रत्येक व्यक्ती आपल्या दृष्टीतून
स्वतःचा वेगळेपणा जपत असते”.
- मराठी लेखणी
1 टिप्पण्या
👌👌👌
उत्तर द्याहटवा