लोक काय म्हणतील..








लोक काय म्हणतील..

 

जुन्या गोष्टी आपण अगदी सहज सोडतो,

पण लोक काय म्हणतील

ही भीती मात्र आपण कधीच सोडत नाही..

 

भूतकाळाच्या आठवणींनी आपल्याला फारसा फरक पडत नाही,

पण त्याच भूतकाळाबद्दल लोक काय म्हणतील  

ह्याचा मात्र आपल्याला नक्कीच फरक पडतो..

 

एखादी नवी गोष्ट घेताना आपण जास्त विचार करून ती घेत नाही,

पण तेच आयुष्यात एखादं नवं पाऊल उचलताना

लोक काय म्हणतील हा विचार मात्र आपण सर्वात आधी करतो..

 

आपलं आयुष्य आपण निर्धास्त जगतो,

पण ते जगताना लोक काय म्हणतील

ह्याची कुठे तरी धास्ती आपण मनात ठेवतो..

 

भविष्याच्या विचाराने आपण भूतकाळ कायम मागे सोडतो,

पण लोक काय म्हणतील हा मनातला विचार मात्र आपण 

कधीच मागे सोडत नाही...

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या