माणसाचा अहंकार..






आजचा लेख म्हणजे माणसाचा अहंकार जो नाही त्यावेळेवर बाहेर येतो.  जसं की, प्रत्येकाला असं वाटत असत आपण म्हणतो तेच बरोबर आहे पण कोणी हा विचार करत नाही की आपणही कधी तरी चुकूच शकतो..


 माणसाचा अहंकार..


      आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असत की, त्याला खूप काही समजत आहे. किंवा एखाद्या विषयावर सगळं काही माहीत आहे.. पण खरं तर तस नसत, एखादी गोष्ट फक्त माहीत असणं आणि त्याबद्दल पूर्ण माहिती असणं ह्यात फरक असतो हे त्या व्यक्तीला कळत नसत.. आणि हे न कळण्यात  प्रत्येक व्यक्ती  येत असते.  कारण प्रत्येकाला अस वाटत असत की, मला ह्यातल सगळं येत. म्हणून मी म्हणत आहे तेच आणि तसच खरं आहे.. मग समोर सांगणारा कितीही त्याची खरी बाजू पटवून सांगत असला.  तरी आपल्याला ती पटत नाही. कारण, माणसाचा स्वभाव..

      माणूस हा असा प्राणी आहे ज्याला चांगलं-वाईट हे सगळं कळत असत आणि त्याप्रमाणेच तो विचार करत असतो.. म्हणूनच मला हे सगळं कळत किंवा मलाच हे येत असं वाटत राहणं सहाजिक आहे.. कारण आपल्याला विचार करता येत असला, तरी आपण बऱ्याचदा त्या विचार करण्याच्या क्षमतेचा वापर हा जिथे करायला हवा तिथे करतच नाही. आणि मग ह्यामुळे आपल्यात असणारा अहंकार हा बरोबर त्यावेळी बाहेर येतो.. ज्यावेळी आपण चुकीची गोष्टही कशी बरोबर आहे हे पटवून देत असतो..  

      आपल्यातला हा अहंकार नाहीसा तेव्हाच होतो.  जेव्हा आपण स्वतःवर ताबा मिळवून समोरच्या व्यक्तीच बोलणं ऐकतो.. मग तेव्हा त्या गोष्टी आपल्याला पटतात आणि आपल्या चुकाही आपल्या डोळ्यासमोर येतात.  

      सध्या तर बरीच अशीही काही लोक आहेत.  जी आपल्या माणसांपासून नकळतपणे लांब होऊन जातात. ह्याला कारण हेच की, समोरच्या व्यक्तीच न ऐकता आपलच म्हण खरं आहे हे सांगून, ते त्या व्यक्तीवर त्याच्या मनाविरुद्ध लादणं. ह्याने ती व्यक्ती तर आपल्यापासून दूर होतेच.  शिवाय तिच्या मनात आपल्याबद्दल नाही ते गैरसमज होऊन बसतात. ह्यामुळे जिवापाड जपलेली ही माणसं एका क्षणांत दूर होऊन जातात.

      आपण ह्या गोष्टी काही मुद्दाम करत नसतो; त्या नकळत होऊन जातात आपल्याकडून..  कारण आपण बोलताना, किंवा आपलं मत मांडताना फक्त आपलेच विचार मांडतो आणि तेच खरे आहेत हे गृहीत धरत असतो. मग ते समोरच्याला पटत आहे का..? की त्याच त्या विषयावर वेगळं मत आहे..  हे सगळे विचार आपण करत नाही. आणि ह्यामुळे आपल्यात आणि त्या व्यक्तीत वाद निर्माण होतात. गैरसमज वाढतात.

      हे सगळं टाळायच कसं ते पूर्णपणे आपल्या हातात असत, आपला अचानक प्रकट होणारा अहंकार गरज नसताना दाखवणं आपण बंद केलं, आणि  समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे जरा लक्ष दिलं तर आपल्याला सहज कळून जात. की, ह्या विषयावर आपल आणि त्या व्यक्तीच मत जुळत आहे की नाही.  जुळत असेल तर प्रश्नच संपतो. पण जुळत नसेल तर नेमकं कोणाच काय म्हणं आहे.., आणि नेमकं कोणाच म्हण बरोबर आहे.. हे प्रत्येकाची बाजू लक्षात घेऊन मग ठरवलं तर सहज प्रश्न सोडवता येतात. म्हणूनच आपण समोरच्याच ऐकायला शिकलं पाहिजे.

 

                  - मराठी लेखणी 



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या