त्याच्या मनातलं वादळ..





आजचा हा लेख लिहिण्याचं कारण म्हणजे, प्रत्येक मुलाच्या मनात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात चालू असणारी घालमेल..


त्याच्या मनातलं वादळ..


      प्रत्येक मुलाला नेहमीच असं म्हटल्या जात की, ‘तू मुलगा आहेस म्हटल्यावर काय, तुला तर हवं ते हवं तसं वागता येत..’  पण खरंच असं असत का..? मुलगा आहे म्हणून त्यालाही त्याच्या मनानुसार प्रत्येक गोष्ट करता येते का..?

      नाही..!  जसं प्रत्येक मुलीला सतत हे सांगितल्या जात की, ‘तू मुलगी आहेस.., हे करू नको ते करू नको, उद्या तुला लग्न करून दुसऱ्या घरी जायचं आहे.. नीट वळण लाव..’  अगदी तसंच प्रत्येक मुलालासुद्धा हे सतत ऐकावंच लागत असत की, ‘तू मुलगा आहेस.. उद्या तुझ्यावर घरातली जबाबदारी आहे.., तुला हे करायचं आहे पुढे.., तुला हे सांभाळायचं आहे..’ हे आणि अजून बऱ्याच गोष्टी मुलांनाही ऐकाव्या लागतात.. एका मुलीला जेवढं जबाबदारीने वागावं लागत तेवढ्याच जबाबदारीने एका मुलालाही वागावं लागत.

      प्रत्येकाला असं वाटत की, मुलाच शिक्षण झालं त्याचं लग्न झालं की, सगळं झालं.., मुलगा नीट स्तिर झालं आयुष्यात..त्याने त्याला हवं ते सगळं मिळवलं..  पण खरं तर तसं नसत.  मुलांनासुद्धा घरच्या जबाबदारीमुळे अनेक गोष्टी सोडाव्या लागतात, अनेक स्वप्न विसरावी लागतात.. स्वतः बरोबरच घरातल्या लोकांचाही विचार त्यांना करावा लागतो. मग अशावेळी त्यांना स्वतःच्या स्वप्नांपेक्षा घरातल्यांची जबाबदारी महत्वाची वाटत असते.

      तसंच लग्नानंतर मुलगा मुलीसारखं त्याचं घर सोडून जात नसला, तरी त्याला आहे ते घर नव्याने सावरावं लागत असत.. जुनी नाती आणि जोडली जाणारी नवी नाती ह्याचं दडपण त्याच्याही मनावर असत.  फरक फक्त एवढाच असतो की, हे सगळं तो कधी बोलून दाखवत नाही. ह्या प्रत्येक गोष्टी तो स्वतःच्या मनात ठेवून आयुष्य जगत असतो.. आणि आपण मात्र अगदी सहज मुलांना म्हणून जातो, ‘अरे, तू मुलगा आहेस.. तुला काय गरज आहे विचार करण्याची..!’, ‘तू हे केलं तर तुला कोण काय बोलणार आहे..!’

      आपल्याला वाटत तितकं सोपं आयुष्य मुलांचही नसत.  त्यांनाही घरचा विचार असतो, त्यानाही मुलींसारखं घरी कोणी तरी विचारणार असत.., त्यांचेही वडील त्यांना विचारत असतात.  पण ह्या गोष्टी कधी कोणी समजून घेत नाही. मुलींसारखं त्यांचंही आयुष्य अनेक जबाबदारींनी भरलेलं असत.., त्यांच्या मनात असलेल्या अनेक अपेक्षा, त्यांनी काही कर्तव्य म्हणून तर काही जबाबदारी म्हणून सोडून दिलेल्या असतात.. म्हणूनच जसं एका मुलीला समजून घेतल्या जात, तिचं मन समजून घेतल्या जात तसंच मुलांचही मन प्रत्येकाने समजून घ्यायला हवं.. त्यांच्या मनात चालणार हे वादळ त्यांनी कितीही मनात दडवून ठेवलं तरी आपण मात्र ते ओळखायला हवं.

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या