नात्यांची जपणूक..





नात्यांची जपणूक..

      आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही असे प्रसंग नक्कीच येतात. जिथे आपल्याच माणसांना असं वाटायला लागत की, आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.. किंवा आपल्यासाठी ते आता तितके महत्वाचे राहिले नाही. पण खरंच असं होत का..? आपल्या जवळच्या व्यक्ती नवीन कोणाच्या येण्याने आपल्यापासून खरंच दूर जातात का..?

      तर ह्याच उत्तर हो आणि नाही सुद्धा.. हो ह्यासाठी कारण, आपल्या जवळच्या व्यक्ती ह्या आपल्यापासून तेव्हाच दूर जातात जेव्हा आपण स्वतः त्यांना दूर जाण्याचं कारण देतो. आपल्या नकळत आपण काही असं वागून किंवा बोलून जातो की, त्याचा त्या व्यक्तीला त्रास होतो आणि मग हळू हळू ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाऊ लागते. मग अशातच आपल्या जवळ त्या व्यक्तीसारखीच एखादी नवी व्यक्ती आली तर आपण नव्या आलेल्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवू लागतो.. कारण आपल्यालाही त्या नव्या व्यक्तीसोबत बोलायचं असत, त्या व्यक्तीला समजून घ्यायचं असत. आणि मग ह्याचा परिणाम सहाजिकच आधीपासून आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तीसोबतच्या आपल्या नात्यावर होतो.

      आता नाही ह्यासाठी कारण, कधी कधी कितीही वाद झाले, गैरसमज झाले तरी एकमेकांशी बोलल्याने ते दूर होतात आणि नवी एखादी व्यक्ती आली तरी आपला त्या व्यक्तीवर असणारा विश्वास किंवा आपल्याला त्या व्यक्तीचा माहीत असणारा स्वभाव ह्या सगळ्यामुळे जरी नवीन व्यक्तीशी आपली मैत्री झाली. तरी जुन्या लोकांकडे आपलं दुर्लक्ष होत नसत. आणि कधी थोड्या वेळासाठी ते झालं तर ती व्यक्ती आपल्याला त्यावेळी समजून घेते.  

      खरं तर, आपल्या जवळच्या माणसांना जपणं, त्यांना वेळ देणं, त्या व्यक्ती आपल्यापासून दूर तर जात नाहीये ना हे सगळं बघणं हे आपल्याच हातात असत. आपल्या जवळची सगळी नाती कशी जपून ठेवायची हे आपण थोडं विचार केला तर नक्कीच आपल्याला कळून जात असत. शेवटी, आपल्या माणसांना समजून घेणं, त्यांना नेहमी आपल्या सोबत ठेवणं हे आपलच काम असत. आणि समजून घेत, सांभाळून घेत, प्रेमाने  जर आपल्या जवळची माणसं जपली तर नवीन कोणाच्या येण्याने काही फरक पडत नसतो. कारण, तेव्हा आपल्याला आणि त्या व्यक्तीला ह्याची जाणीव असते की, समोरची व्यक्ती आपल्याला कधी अंतर देणार नाही.

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या