एकटेपणा..








      आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात एकटेपणा हा येतोच. कधी कोणाच्या जाण्यामुळे तर कधी आयुष्यात घडणाऱ्या परिस्थितीमुळे..


एकटेपणा..      

        आयुष्यात घडत जाणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंद देईलच असं नसत. कधी गरज म्हणून तर कधी पर्याय म्हणून काही गोष्टी आयुष्यात कराव्या लागतात.. जसं की, एखादा जॉब.. कधी गरज म्हणून तर कधी पर्याय म्हणून तो करावा लागतो. आणि मग गरज किंवा पर्याय म्हणून केलेली प्रत्येक गोष्ट काही वेळेनंतर त्रासदायक वाटू लागते. मग हळू हळू त्या गोष्टीतून इतकं आपलं मन वैतागून जात, की शेवटी आपण एकटं राहू लागतो. मग आपल्याच आयुष्यात गुंतणं, सतत एकाच विचारात राहणं हे सगळं सुरू होत. ह्या सगळ्यामुळे आपण एकटे पडत जातो. आणि मग हा एकटेपणा वेळेत लक्षात आला नाही तर आपल्या आजूबाजूची, हक्काची अशी माणसंही आपण गमावून बसतो.

      तसंच आपल्या आयुष्यात महत्वाच्या व्यक्तीच आपल्याला अचानक सोडून जाणं हे सुद्धा आपल्याला एकटं पडत. आपल्याला आपलं मन अशावेळी फक्त त्याचं व्यक्तीची आठवण करून देत राहत. आणि परिणामी आपण एकटे होऊन जातो.

      खरं तर, एकटेपणा हा मुळात कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने येतच नसतो. एकटेपणा हा आपण स्वतः आपल्या आयुष्यात आणत असतो.  आपण आपल्या मनाला सतत त्याच एका विषयावर गुंतवून ठेवतो. सतत असच का झालं, तसच का झालं असं करत बसतो आणि मग नकळत आपण आपल्याच एकटेपणाच्या विश्वात रमून जातो.

      स्वतःच्या मनाला आवर घालत त्रास देणाऱ्या त्या विचारातून बाहेर पडलं आणि थोडं आपल्या आजूबाजूला लक्ष दिलं तर नक्की कळत आपल्याला, की आपण किती छान आणि चांगल्या मनाची माणसं जोडलेली आहेत.  जी अजूनही आपल्यासोबत आहेत..

      मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत असेल तर आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे. आणि मन वळवण्यासाठी जर काहीच मार्ग भेटला नाही तर आपल्याला बोलावं वाटणाऱ्या, आपलं बोलणं ऐकून घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आपण  आपलं मन मोकळं केलं पाहिजे. कारण, मनात चाललेल्या गोष्टी बोलून टाकल्या की, मन हलकं होत. मग आयुष्यात आलेला  हा एकटेपणा हळू हळू नक्कीच दूर होत जातो. आपण फक्त त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या