आयुष्यातला खरा आनंद..





        आपलं मन नेहमी त्याच गोष्टीच्या मागे फिरत असतं, जी गोष्ट मिळवणं आपल्याला शक्य नसत..


आयुष्यातला खरा आनंद.. 

            कधी कधी खूप काही मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण, आहे त्याचा आनंद घ्यायचं विसरून जातो. आणि जे मिळवता येणं शक्यच नाहीये त्याच्या मागे फिरत बसतो. परिणामी हातात असणाऱ्या गोष्टीचा आनंद आपण घेत नाही. ह्याची जाणीव खरं तर आपल्याला होतच नाही. कारण आपण हातात असणाऱ्या गोष्टीला कमी किंवा अर्थहीन समजत असतो. मग त्या गोष्टीमुळे आपल्याला कितीही फायदा होत असला तरी आपण त्याकडे दुर्लक्षच करत जातो. हे सगळं होत कारण, आपलं मन जे मिळवणं शक्य नाही त्यात गुंतलेलं असत म्हणून..

          तसंच आपल्या आयुष्यात असणाऱ्या नात्यांचं सुद्धा असत. आपण जी माणसं समोर आहे त्यांचा कधीच विचार करत नाही. पण जे समोर नाहीये किंवा जे पुन्हा कधी समोर येऊच शकत नाही. त्याच माणसांचा आपण जरा जास्त विचार करत जातो. आपलं मन नेहमी जे नाहीये त्यातच गुंतलेलं राहत. आणि जे आहे त्यांच्याकडे आपण पाठ फिरवतो.

            ‘जे नाही किंवा जे आपण कधी मिळवू शकत नाही त्याचं गोष्टीचा सतत विचार करत राहणं हे कितपत योग्य आहे..?’, ‘आपण प्रयत्न करूनही एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येत नसेल तर त्या व्यक्तीसाठी आपण आपलं आयुष्य थांबवणं हे बरोबर आहे का..?’

            मान्य आहे.., जगणं खूप अवघड असत जे हवं आहे ते जर मिळत नसेल तर.. पण जर ती गोष्ट आपण प्रयत्न करूनही जर हातातून सुटत असेल. तर त्याचं एक गोष्टीवर अडून बसण्यापेक्षा आयुष्यात असणाऱ्या दुसऱ्या गोष्टींचा आनंद घेण्यात काय वाईट आहे..?  तसंच जर आपल्याला जवळ असणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात जर थांबत नसेल तर त्या व्यक्तीसाठी आपण आपल्या आयुष्यातल्या इतर व्यक्तींना जपणं आणि त्यांच्यासोबत काही गोष्टींचा आनंद घेणं ह्यात काय वाईट आहे..? कारण, आपण प्रयत्न करूनही जर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहत नसेल. तर आपण आपलं आयुष्य त्या व्यक्तीसाठी वाया घालवण्यात काहीच अर्थ नाहीये..  

            म्हणूनच आयुष्यात जे आहे त्या गोष्टींचा, त्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. कारण, आज हातात नसणारी गोष्ट कदाचित उद्या मिळेलं; पण ती गोष्ट मिळाल्यावर आधीपासून हातात असणारी गोष्ट जर दुरावली. तर तेव्हा त्याचा त्रास जास्त होईल.. म्हणून आज आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा , प्रत्येक नात्याचा आनंद घेता आला पाहिजे. कारण, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि वेळ आहे तोपर्यंतच त्या गोष्टीचा अनुभव हा मनाला आनंद देत असतो. त्यामुळेच आयुष्यात वर्तमानात आनंद शोधणं हे जास्त गरेजच असत. 

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या