तिचा होकार...






तिचा होकार...

 

अनेकांनी तिच्या मनाच्या दारावर यावं..

पण दार मात्र फक्त त्याच्यासाठीच उघडावं..

 

दार उघडावं खरं, पण तिच्याकडून नकाराची घंटा वाजावी..

तिचा नकार होकारात बदलेलं ही अपेक्षा त्याची असावी..

 

एकीकडे त्याला आतुरता असावी होकाराची..

तर दुसरीकडे तिला चिंता वाटावी,

उद्या बोल लावणाऱ्या लोकांना सामोरे कसं जावं ह्याची..

 

प्रेम कि समाज ह्यात तिचं मन गुरफटत जावं..

परंतु इकडे त्याने मात्र तिला मिळवण्यासाठी वाटेल ते करावं..

 

अखेर पाहून त्याच्या मनाची घालमेल, 

तिनेही आता निश्चय करावा..

खऱ्या अर्थाने त्याला आज

प्रेमातला नकार बदलून होकार तिचा मिळावा...

 

          - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या