आयुष्यातली काही स्वार्थी,अहंकारी लोकं..







आयुष्यातली काही स्वार्थी,अहंकारी लोकं..

            आपल्या आयुष्यात अशी अनेक लोकं आपल्याला भेटतात जी स्वतःच्या चुका कधी मान्य करत नसतात. अशा लोकांना आपण चुकीच वागत आहोत हे कळत असत. पण आपण आपली चूक नाही.  असच त्यांच दरवेळी म्हणं असत. अर्थात अशी लोकं स्वार्थी,मतलबी,अहंकारी असतात. जी स्वतःला त्रास करून न घेता, कायम दुसऱ्याला त्रास देत असतात.  अशा लोकांना कोणाच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींनी काही फरक पडत नसतो. कारण, त्यात त्यांचा काही फायदा किंवा स्वार्थ नसतो म्हणून..

            खरं तर, अशा लोकांपासून आपण लांब राहणच आपल्या हिताच असत. कारण, एक तर अशा लोकांना कोणाची किंमत नसते ना ते कधी कोणाच्या चांगल्याचा विचार करत असतात. त्यांना फक्त स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी कळत असतात. इतकच नाही तर, त्यांना स्वतः केलेल्या चुका कधीच दिसतच नसतात. उलट त्या चुकांचा दोष ते समोरच्या व्यक्तीवर अगदी सहज ढकलून देत असतात.  आणि  म्हणूनच अशा व्यक्तींच्या वागण्याचा आपण कधी आपल्या मनावर किंवा आपल्या विचारांवर परिणाम होऊ द्यायचा नसतो. कारण त्यांना हेच हवं असत की,  ‘एखाद्या गोष्टीचा मानसिक त्रास आपण करून घ्यावा, किंवा आपण नेहमी त्यांच ऐकावं, ते म्हणतील तसंच वागावं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण काहीच न म्हणता आनंदाने स्वीकारावं..’

            मग अशा अविचारी,स्वार्थी,आणि दुसऱ्याचा तिरस्कार करणाऱ्या लोकांना आपण आपल्या आयुष्यात का घुसू द्यायचं..?, आणि जर ते आपल्या आयुष्यात  घुसत असतील, आपल्या विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतील. तर तेव्हा आपण आपल्या मनाला पटणारी गोष्ट करत राहणं हे योग्य नाही का..?

             आपल्या आयुष्यात आपल्याच जवळची लोकं आपल्या सोबत असं वागत असतात. मग त्यांच्या अशा वागण्यामुळे नकळत आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत जातो. परिणामी आपण आतून पूर्णपणे खचून जातो. पण अशावेळी खचून न जाता आपण सकारात्मक आणि हिंमतीने आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. त्या लोकांकडे दुर्लक्ष करत. आपलं आयुष्य आपल्याला पटणाऱ्या गोष्टीवर जगलं पाहिजे. कारण, आपल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींनी त्यांना तसाही काही फरक पडत नसतोच. मग आपण तरी आपल्या आयुष्यावर अशा लोकांच्या वागण्याचा फरक का पडू द्यावा..! शेवटी, आपल्याला एकच आयुष्य भेटत असत, त्यातही जर आपण इतरांमुळे ते खराब करून घेत असू तर खरंच, आपण खूप मोठी चुक करत आहोत.. म्हणून आपल्याला पटणाऱ्या गोष्टी करत राहणं आणि दुसऱ्याचा कधीच विचार न करणाऱ्या स्वार्थी व्यक्तिंपासून लांब राहणच कायम आपल्या हिताच असत.

 

            - मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या