जेव्हा आपला अतिसमजदारपणा आपल्यासाठीच घातक ठरायला लागतो...




 

जेव्हा आपला अतिसमजदारपणा आपल्यासाठीच घातक ठरायला लागतो...


        आपण एखाद्याला जितकं समजून घेत जातो कधी कधी तितका त्याचा त्रास आपल्याला होतो. कारण, आपण समजून घेतोय म्हटल्यावर समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरून चालते. कितीही चुका करत गेलं तरी आपल्याला माफ केल्याचं जात असा समज ते करून घेतात.. आणि मग परिणामी त्यांच्या अशा वागण्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. 

       हाच समजदारपणा आपल्यासाठी कधी कधी घातक होऊन बसतो. एखाद्याला समजून घेत होणाऱ्या चूका मान्य करणं चुकीचं नाहीये. पण मग आपण जसं सगळं विसरून नवीन सुरुवात करतो तसच त्या व्यक्तीने सुद्धा सगळं विसरून नव्याने सुरुवात करणं गरजेचं असत. पण काही वेळा तसं होत नाही. आपण विषय सोडून दिला तरी पुन्हा नव्याने तो विषय किंवा ती चूक होते आणि मग पुन्हा आपणच समजून घ्यावं असा हट्ट त्या व्यक्तीचा असतो. म्हणूनच एका मर्यादेपर्यंत गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. 

       आपण दरवेळी समजून घेत गेलं की, आपल्याला समोरच्याच्या अशा वागण्याचा काही फरकच पडत नाहीये. असा गैरसमज त्या व्यक्तीचा होऊन जातो. आणि मग ह्या चुका सतत होत जातात..

         म्हणून एक दोन वेळेनंतर समजून घेऊन सुद्धा जर त्याच चुका परत होत असतील.  तर आपण त्याविषयावर सरळ शब्दांत त्या व्यक्तीला बोललं पाहिजे. कारण,सतत असं होत असेल तर त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की, आपण काही केलं तरी कोणी काही बोलत नाही किंवा बोललं तरी थोड्यावेळाने तो विषय सोडून नवीन सुरुवात करतात.. 

        तेव्हा मग आपण जितकं समजून घेऊन नात टिकवायला जातो तितकं ते नात तुटायला लागत. कारण, 'एखादं नात तेव्हाच टिकत जेव्हा ते टिकवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जातात..'

         आपल्या माणसांना आपण समजून घेतलं पाहिजेच. पण त्या समजून घेण्याची एक मर्यादा असते.फक्त आपणच समजून घ्यायच आणि समोरच्याने तोंडावर हो म्हणत मागे मात्र पुन्हा तेच करायचं अशा एका बाजूच्या नात्याला काहीच अर्थ नसतो. जसं आपण समजून घेतोय तसंच आपलं सुद्धा समजून घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असत. पण त्यासाठी प्रयत्न मात्र कोणी करत नाही. मग फक्त आपणच दरवेळी समजून घेत राहायचं आणि समोरच्याने वाटेल तसं वागायचं हे कायम असं सुरूच राहत.. आणि तेच जर आपण वेळेत बजावून सांगितलं तर त्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव होते. आणि जाणीव नाहीच झाली तर, निदान आपल्याला आपण चुकीच्या व्यक्तीला समजून घेत आहोत ह्याची जाणीव होते.  

        पण हे सगळं वेळेत केलं पाहिजे कारण, एकदा वेळ निघून गेल्यावर आपण जर एखाद्या गोष्टीवर रागात काही बोलून गेलो तर मग तेव्हा त्या व्यक्तीला ह्याचा त्रास होतो की, 'आतापर्यंत तर कधी असं झालं नाही मग आजच असं का..?' , 'इतके दिवस तर असं काही झाल्यावर जाऊदे म्हणून विषय टाळल्या जात होता मग आता हे असं का..?' असे प्रश्न मग त्या व्यक्तीला पडायला लागतात.. आणि असे प्रश्न पडले की, नक्कीच वाद निर्माण होतात आणि परिणामी आपल्या जवळची आपली माणसं दुरावतात.. म्हणून वेळेत ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत;अतिसमजुदारपणा न दाखवता..

       म्हणूनच,नेहमी समजून घेण्यापेक्षा कधी तरी समोरच्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणं जास्त गरजेचं असत. 


               -मराठी लेखणी


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)