शेवटी ती परकीच असते..




शेवटी ती परकीच असते..

 

      आपण अश्या समाजात राहतो जिथे कितीही आपलेपणाची भावना ठेवून मुलीला वाढवलं जात असलं तरी मनातून मात्र ती प्रत्येक मुलगी प्रत्येकासाठी शेवटी परकीच असते. मुलींना तोंडावर आपले म्हणणारे कितीतरी लोक असे असतात जे मनातून त्यांना परकच समजत असतात.

      लहानपणापासून प्रत्येक मुलीला सगळ्यात आधी काही सांगितल्या जात असेल तर ते हेच सांगितल्या जात की, ‘मुलगी आहेस हेच कर , मुलगी आहेस तेच कर..’ आणि हे ऐकून ऐकून मग त्या प्रत्येक मुलीला प्रत्येक पावलावर असच वाटत राहत की, ‘आपण उगाच मुलगी झालो..!’

      आणि लोकाना दाखवल्या तर असं जात की, मुलींची खूप काळजी असते प्रत्येकाला..पण खरं तर असं नसत. कोणाला काळजी नसतेच मुळात.. प्रत्येकाला काळजी असते ती समाजाची आणि आपल्या अब्रूची..

      मग त्या गोष्टीचा आपल्या मुलीला कितीही त्रास झाला तरी, त्याचा ना तिच्या घरच्यांना फरक पडत असतो ना इतर कोणाला.. प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करण्यात मग्न असतो, स्वतःच्या मनाचा विचार करणं. एवढंच काय ते प्रत्येकाला येत असत.  मग त्या मुलीला पण मन आहे हे मात्र प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती सहज विसरून जात असते.

      प्रत्येक ठिकाणी मुलगा-मुलगी एक समान म्हणणारे सगळे हे फक्त तोंडावर लोकांना दाखवण्यासाठी असं म्हणत असतात. पण प्रत्यक्षात मात्र कोणी मुलगा-मुलगी समान आहेत हे मानतच नसत. शेवटी न बोलता पण वागण्यातून मात्र हे दाखवूनच दिल्या जात की, ‘एका व्यक्तीच लिंग हेच समाजात त्या व्यक्तीच अस्तित्व ठरवत असत..’

 

            -मराठी लेखणी 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या